केळ्याची साले खा आणि वजन घटवा


स्वस्तात मस्त, सर्वाना सहज परवडणारे, बारमाही मिळणारे आणि बहुगुणी फळ कोणते असेल तर ते म्हणजे केळे. केळी खाण्याचे अनेक फायदे आणि त्याचे आरोग्यासाठीचे उपयोग यावर बरेच सांगितले गेले आहे, लिहिले गेले आहे. आता नवीन संशोधनातून असे दिसून आले आहे कि केळ्याइतकीच किबहुना केळ्यापेक्षा त्याची साले अधिक गुणकारी आहेत. आपण आजवर नेहमी केळी खाऊन त्याचे साले फेकत आलो आहोत ती चूक अजून दुरुस्त करता येईल.

केळ्याच्या सालात तंतू म्हणजे फायबरचे प्रमाण खूप आहे. आहारात फायबरचे प्रमाण जास्त असेल तर वजन कमी होते. १ महिनाभर केल्याची साले खाल्ली तर २ ते ३ किलो वजन कमी होते असा दावा संशोधक करत आहेत. केळयातील फायबर विरघळणारे आणि न विरघळणारे अश्या दोन्ही प्रकारचे आहेत यामुळे रक्तातील कोलेस्ट्रोल कमी होण्यास मदत होते.


डोळ्यांना कमी दिसू लागले असेल तरी केळ्याची साले सेवन केल्यास त्यात असलेल्या ल्युटेनमुळे दृष्टी सुधारते. तैवान विद्यापीठात केलेल्या संशोधनात असे आढळले कि केळ्याच्या सालीत सरोटेनीन हे रसायन असते जे माणसाला आनंदी ठेवण्यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळे काही कारणांनी नैराश्य आले असेल, मूड नसेल तर २ केळ्याची साले रोज ३ दिवस खाल्ली तर सेरोटीनीनची पातळी वाढते आणि नैराश्यावर मात करता येते.

केळ्याच्या सालीत ट्रीपटोफेन नावाचे रसायन आहे. हे रसायन चांगली आणि शांत झोप येणास उपयोगी असते. हिऱव्या केळ्याची साल खाल्ली तर लाल रक्तपेशी फुटण्याचे प्रमाण कमी होते आणि बद्धकोष्ठता दूर होते तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढते. केळ्यामुळे त्वचेवरील मुरूम पुटकुळ्या कमी होतात आणि त्वचा तेजस्वी बनते, सुरकुत्या कमी होतात आणि वर्ण उजळतो.

Leave a Comment