असे देश आणि असे नियम


आपल्या देशात आपण एखादी गोष्ट किंवा कृती सहजी करून जातो त्यावेळी हि कृती दुसऱ्या देशात दंडनीय अपराध असेल अशी आपल्याला कल्पनाही नसते कारण प्रत्येक देशाचे नियम कायदे वेगळे असतात आणि ते तसे बनविण्यासाठी काही करणेही असतात. यातील काही नियम तर आपल्याला अंधश्रद्धा वाटतात आणि असे नियम असलेले हे देश विकसनशील अथवा मागासलेले नाहीत तर चांगले विकसित देश आहे. अश्या काही देशातील नियम आणि कायद्याची ओळख करून घेऊ.


आपल्या देशात बटाटा हा अनेकांच्या रोजच्या आहाराचा भाग आहे आणि आपण कितीही बटाटे विकत घेऊ शकतो. पण उत्तर ऑस्तेलीयात जादा बटाटे खरेदी केल्यास तुरुगवास भोगावा लागतो. त्यामुळे या भागात फिरायला जाणार असाल तर बटाटा विसरायचा. येथे बटाटा अतिशय अल्प प्रमाणात पिकतो त्यामुळे प्रत्येकाला किती बटाटा खरेदी करता येईल याचे प्रमाण कायद्याने ठरवून दिले आहे. त्यामुळे कायदा मोडला कि तुरुंगवास होऊ शकतो.


आपल्याकडे घरात नवीन बाळ आले कि त्याचे नाव काय ठेवायचे हे आईवडील, घरातील नातेवाईक ठरवितात. डेन्मार्कमध्ये मात्र ही सोय नाही. येथे बाळाचे नाव सरकार सुचविते म्हणजे नावाची यादी पालकांना देते व त्यातीलच एक नाव निवडावे लागते. विचित्र नावे ठेवली जाऊ नयेत म्हणून हि खबरदारी घेतली गेली आहे असे समजते. हंगेरीत डिनर घेताना कॉर्नर टेबल निवडले तर लग्नाचा योग लवकर येतो असे मानले जाते. रशियातहि असाच समज आहे.


रस्त्यातून जाताना अचानक झाडावरून पक्षी शीटला तर अंगावर येणारी नक्षी आपल्याला अगदी नकोसे करते. त्यात महत्वाच्या कामासाठी जात असताना असा प्रकार घडला तर आपला मूड जातो. रशिया मध्ये मात्र पक्ष्याने अंगावर अशी घाण करणे हे समृद्धीचे लक्षण मानले जाते. त्यामुळे पक्ष्याने घाण केली तर त्यांना आनंद होतो. आपल्याकडे आपण चोवीस तास कधीही हवे ते खाऊ शकतो. तुर्कस्तानात मात्र रात्रीच्या वेळी च्युइंगम खाणे वाईट मानले जाते. रात्री च्युइंगम खाणे म्हणजे प्रेताचे सडलेले मास खाण्यासारखे येथे मानले जाते.


फिलिपिन्समध्ये कुणालाही कितीही आवश्यक वाटला तरी घटस्फोट घेता येत नाही. त्यामुळे एकदा लग्न लागले कि मरेपर्यंत नवरा बायको म्हणूनच जगावे लागते. त्यामुळे भांडा पण नांदा असे येथले सूत्र आहे. मुस्लीम नागरिकांना विशिष्ट परिस्थितीत घटस्फोट घेण्याची सुविधा मिळते.. थायलंड मध्ये देशाचे चलन खूप सुरक्षित ठेवले जाते. चुकून जरी नोटेवर पाय पडला तरी तो गुन्हा मानला जातो आणि त्यासाठी शिक्षा होते शिवाय काहीवेळा ६०० डॉलर्स दंड ठोठावला जातो. याचे कारण असे कि येथील चलनावर राजाची प्रतिमा आहे आणि राजाला थायलंड मध्ये देव मानले जाते.

Leave a Comment