तलावामध्ये दफन असलेले १०७ वर्षे जुने रहस्य अखेरीस उघड


अमेरिकेतील लेक सुपीरियर येथे पाण्यामध्ये खोलवर, अनेक दशकांपासून एखादे रहस्य दडलेले असेल, ह्याची जाणीव कोणालाच नव्हती. पण अखेरीस जेव्हा हे रहस्य उघडकीला आले, तेव्हा लोकांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. उत्तरी अमेरिकेतील सुपीरियर लेक मध्ये अशी वस्तू सापडली, जिची कल्पना ही कधी कोणी केली नसेल. हा लेक थंडीच्या दिवसांमध्ये गोठून जात असताना देखील इतकी मोठी वस्तू ह्यामध्ये आली कुठून हे कोणीच सांगू शकलेले नाही.

थंडीच्या दिवसांमध्ये गोठून जाणाऱ्या ह्या तलावामध्ये एक भले मोठे जहाज सापडले आहे. ह्याला लोक ‘ मिनी टायटॅनिक ‘ ह्या नावाने संबोधत आहेत. तलावाच्या तळाशी, म्हणजेच सुमारे २०७ फुट खोलीवर सापडलेले हे जहाज १०७ वर्षे जुने असल्याचे म्हटले जात आहे. अनेक फोटोग्राफर्सनी पाण्यामध्ये शिरून ह्या जहाजाचे, आश्चर्यचकित करून टाकणारे फुटेज घेतले आहे.

‘डेली मेल’ मधील एका वृत्तानुसार हे जहाज १९११ साली बुडाले होते. हे जहाज स्कॉटलंडमध्ये बनविले गेले असून दोनशे फुट लांबीचे आहे. ह्या जहाजाचे फोटो घेताना, जुन्या काळामध्ये प्रवेश केल्याची भावना झाल्यासारखे वाटल्याचे फोटोग्राफर म्हणतात. हे जहाज आतून अतिशय भीतीदायक दिसत असून, ह्या जहाजामध्ये असलेल्या पियानो, खुर्च्या इत्यादी वस्तू जिथल्या तिथे आहेत.

ह्या वस्तू जिथल्या तिथे पाहून, इथे कोणी राहत आहे किंवा काय अशी शंका यावी, इतक्या जहाजातील वस्तू व्यवस्थित मांडलेल्या असल्याचे, आणि त्या आपल्या जागेवरून अजिबात न हलल्याचे समजते. आपला जीव धोक्यात घालून फोटोग्राफर्स नी ह्या जहाजाचे फुटेज घेतले आहे. एकूण शंभर मिनिटे पुरू शकेल इतका प्राणवायूचा साठा घेऊन हे फोटोग्राफर छायाचित्र टिपण्यास पाण्यामध्ये उतरले होते. त्यांना पाण्याबाहेर येण्यासाठी ७५ मिनिटांचा कालावधी लागला.

Leave a Comment