वाढदिवस मोठ्याचा, गिफ्ट धाकट्याला


भारतात रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी आणि त्यांचे धाकटे बंधू अनिल तसेच अंबानी परिवार याच्याविषयी काही ना काही चर्चा सतत सुरु असते. काल म्हणजे १९ एप्रिल ला मुकेश यांचा वाढदिवस झाला. मात्र याचे सर्वात मोठे गिफ्ट अनिल अंबानी यांना मिळाले आहे. त्यामुळे वाढदिवस मोठ्याचा गिफ्ट धाकट्याला अशी चर्चा सुरु झाली आहे.

झाले असे की अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रा लिमिटेड कंपनीला काळ पूर्व किनाऱ्यावरील जीमिडीपेट आणि गोटलम या दरम्यान टाकण्यात येणाऱ्या तिसऱ्या लाईनचा निर्माणाचे कंत्राट मिळाले असून ते ७७४ कोटी रुपयांचे आहे. अनिल अंबानी याचा व्यवसाय सध्या जरा डोलमोल अवस्थेत असल्यने या नव्या कान्त्रातामुळे त्याच्या व्यवसायाच्या बुडत्या नौकेला चांगलाच हातभार लागणार आहे. १०५ किमी लांबीचा हा रेल्वे मार्ग आंध्र आणि ओरिसा या राज्यात बांधला जात आहे. अनिल अंबानी यांची रिलायंस इन्फ्रा यात सिव्हील ट्रॅक, इलेक्ट्रिफिकेशन, सिग्नलिंग, दूरसंचार संबंधी कामे करणार आहे. यात १३ रेल्वे स्टेशन उभारणे आणि स्टाफ क्वार्टर बांधणे याचाही समावेश आहे.

रिलायंस इन्फ्राचे सीईओ अरुण गुप्ता म्हणाले, आमच्या कंपनीने रेल्वे, मेट्रो साठी अनेक कामे यशस्वी केली आहेत. या क्षेत्रात आमचा अनुभव मोठा आहे. २०१९ पर्यंत विविध भागात ५० हजार कोटींची कंत्राटे आम्ही मिळवू अशी खात्री आहे.

Leave a Comment