एमआरएफ टायरच्या शेअरचा विक्रम


देशातील बलाढ्य टायर उत्पादक कंपनी एमआरएफने शेअर बाजारात नवा विक्रम नोंदविला असून त्याच्या एका शेअरची किंमत ८० हजार रुपयांवर गेली आहे. या पातळीवर पोहोचणारा हा पहिलाच शेअर बनला आहे. याचा अर्थ आता सर्वसामान्य माणसाला हा शेअर खरेदी करणे आवाक्याबाहेर जाणार आहे. विशेष म्हणजे या कंपनीचा पाया रचणारे केएम मेप्पीलाई याची एके काळी रस्त्यावर फुगे विकून घर चालविले होते.

मेप्पीलाई यांनी हिम्मत, सातत्य आणि कठोर परिश्रम याची कास धरून कंपनीला या उंचीवर पोहोचविले होते. एमआरएफ म्हणजे मद्रास रबर फॅक्टरी. स्वातंत्रपूर्व काळात याच्या स्वातंत्रसैनिक वडिलांना तुरुंगात टाकल्यावर मेप्पीलाई यांनी केरळच्या रस्त्यात फुगे विकून घर चालविले आणि एकीकडे शिक्षण घेतले. त्यांनी टायर उत्पादनाचे शिक्षण घेतले पण एका खोलीत प्रथम फुग्याचा व्यवसाय सुरु केला आणि नंतर १९४६ साली वयाच्या २४ व्या वर्षी टायर बनविणे सुरु करून १९६० साली हि कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली. त्यांनी अमेरिकन कंपनी मॅसफिल्ड बरोबर त्यासाठी टायअप केला होता. १९६७ मध्ये कंपनीने अमेरिकेला पहिली निर्यात केली आणि १९७३ साली प्रथम नायलॉन टायरची निर्मिती केली.

मेप्पीलई यांचे २००३ साली निधन झाल्यानंतर त्यांच्या मुलांनी व्यवसाय उत्तम सांभाळून ३४ हजार कोटींच्या उलाढालीचा टप्पा गाठला. या कंपनीने त्याच्या भागभांडवलदारांना गेल्या पाच वर्षात ५५० टक्के परतावा दिला आहे. कंपनीचा शेअर मुंबई शेअर बाजारात काळ ७९७९५. ९५ वर खुला झाला आणि आरत्या तासात त्याने ८०,०९९.९५ ची पातळी गाठून विक्रम केला. हा भाव कंपनीसाठी ऑल टाईम हाय होता.

Leave a Comment