मुकेश अंबानीच्या यशात निताच्या जन्मतारखेचा वाटा


आशियातील सर्वात श्रीमंत यादीत नाव असलेले आणि वडील धीरूभाई याच्याकडून मिळालेल्या विरासाठीची भरभराट करण्यात यशस्वी ठरलेले मुकेश अंबानी याचा आज जन्मदिवस. मुकेश याच्या यशात त्यांचे कष्ट, कामातील सातत्य, अचूक निर्णय आणि उत्तम व्यवस्थापन कारणीभूत आहेच पण या यशाला त्याची आणि त्यांच्या पत्नी नीता यांची जन्मतारीखही कारणीभूत आहे यावर कदाचित कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र अंक ज्योतिष्यांच्या म्हणण्यानुसार त्याचा लकी नंबर १ हेही त्याच्या यशामागचे एक कारण आहे.

मुकेश याचा जन्म १९ एप्रिलचा आहे. या तारखेची बरीज होते १. नीता अंबानी याचा जन्म १ नोव्हेम्बरचा आहे. ज्याचे जन्म १,१०,१९ आणि २८ या तारखांना होतात त्या व्यक्ती मुळातच परिश्रमी, मेहनती, मनात असलेली गोष्ट तडीस नेणाऱ्या आणि महत्वाकांक्षी असतात. १ नंबर सूर्याचे प्रतिनिधित्व करतो. सूर्याच्या चारी बाजूनी सर्व ग्रह फिरतात. त्यामुळे या नंबरच्या व्यक्ती यशस्वी होतातच. नीता यांनीहि मुकेश यांना व्यवसायात खूप मदत केली आहे. बिल गेट्स, रतन टाटा, धीरुभाई अंबानी याच्या जन्मांक १ हाच आहे.