भरपूर दागिने घाला आणि आरोग्य मिळवा


दागदागिने घालण्यावरून महिलावर्ग नेहमीच चेष्टेचा विषय बनतो. महिला पुरुषांच्या तुलनेत अधिक बुद्धिमान असतात असे संशोधनातून सिद्ध झाले आहेच. त्यामुळे कुणीही कितीही चेष्टा केली तरी महिलांची दागिने खरेदी आणि दागिने घालणे यांची हौस संपत नाही. कारण महिला त्याच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेमुळे दागिने घालणे हि केवळ हौस नसून ते आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते हे जाणतात. आता याला संशोधनातून पुष्टी मिळाली आहे. सोने, चांदी, हिरे, मोती याचे दागिने घालणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता महिलांना नटण्याची हौस भागविण्याबरोबर आरोग्यप्राप्ती करून घेणे अधिक सोयीचे ठरणार आहे.


संशोधनातून असे दिसून आले आहे की चांदीचे दागिने घालण्याने मानसिक तणाव आणि चिंता दूर होतात तसेच रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत मिळते. चांदी शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.


सोने हा धातू तर आयुर्वेदात औषधातहि वापरला जातो. सोने त्वचेसाठी अति लाभदायी आहे. त्याच्यामध्ये अँटी इन्फ्लेटरी गुण आहेत यामुळे अंगावरील डाग कमी होतात. चेहरा अधिक सतेज दिसतो. सोन्याच्या वापरणे शरीतातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि स्वास्थ्य चांगले राहते. शरीराचे तपमान नियंत्रित होते आणि शरीराची उर्जा नियंत्रित होते. २४ कॅरेट सोन्याच्या वापरामुळे जखमा लवकर भरून येतात.


मोती हा मानसिक आणि शारीरिक स्वास्थ देणारा आहे. मोत्याच्या वापराने रागावर नियंत्रण येते तसेच डोळे चांगले राहतात. मानसिक चिंता कमी होतात. त्यामुळे ज्यांना राग आवरता येत नाही त्यांनी मोत्याचे दागिने जरूर वापरावेत.


हिरा है सदा के लिये असे म्हटले जातेच. हिरा हा नैराश्य दूर करणारा, निगेटिव्हिटी संपविणारा आहे. हिरा वापरला तर तणाव कमी होतात आणि नवीन उर्जा मिळते. हिरयाच्या वापरेने मायग्रेन कमी होते असे दिसून आले आहे.