अॅप डाऊनलोड करण्यात भारतीयांचा क्रमांक पहिला


मोबाईल वरील अॅप डाऊनलोड करण्याच्या बाबतीत भारतीय लोकांनी पुन्हा एकदा पहिला क्रमांक पटकावला आहे. गूगल प्ले स्टोर आणि एप्पल मार्केटमधून डाउनलोड करणाऱ्या वापरकर्त्यांमध्ये भारतीय लोकांची संख्या सर्वाधिक आहे असे एका ताज्या अहवालातून समोर आले आहे.

अॅप मार्केट क्षेत्रात संशोधन करणाऱ्या अॅप अॅनी या कंपनीने हा अहवाल दिला आहे. मार्च 2018 मध्ये संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने अहवाल जारी केला असून कंपनीच्या संशोधनानुसार भारतात अॅप डाऊनलोडमध्ये वार्षिक 41 टक्के वाढ होत आहे. मात्र महसुलाच्या दृष्टीने जागतिक क्रमवारीत भारत 29 सहाव्या स्थानावर आहे.

अॅप डाउनलोडमध्ये भारताचे पहिले स्थान पटकावले असून अमेरिका दुसर्यास आणि चीन तिसर्याक स्थानी आहे, असे कंपनीच्या प्रवक्त्याने इकॉनॉमिक टाईम्सला सांगितले. वर्ष 2018 च्या पहिल्या तिमाहीत 2016 च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत तब्बल 250 टक्यां स नी वाढ झाली आहे, अशी माहितीही या प्रवक्त्याने दिली आहे. या काळात गुगल प्ले व आयओएस जेवढे अॅप डाऊनलोड झाले त्यात भारतीयांचा वाटा 14 टक्के एवढा होता.

अॅप अॅनी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार भारतात सर्वात जास्त व्हिडीओ अॅप डाऊनलोड होतात. पहिल्या दहा अॅपमध्ये जिओ टिव्ही, एअरटेल टीव्ही आणि हॉटस्टार हे तीन व्हिडीओ अॅप आहेत. ही प्रवृत्ती फक्त भारतातच दिसते. अमेरिका आणि चीनमध्ये पहिल्या दहा अॅप डाऊनलोडमध्ये केवळ व्हिडीओ अॅप आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

Leave a Comment