नोव्हेंबर महिन्यापासून झालीच नाही ५००च्या नोटांची छपाई


नाशिक- ५००, २००, १०० आणि २० रुपयांच्या नोटांची नाशिकमधील करन्सी नोट प्रेसमध्ये छपाई ४४ टक्क्यांनी घटल्याची बाब समोर आली आहे. तर गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यातच ५०० रुपयांच्या नोटांती छपाई थांबविण्यात आली. त्याचबरोबर १ एप्रिलपासून २००, १०० आणि २० रुपयांच्या नोटांची छपाई थांबविण्यात आली असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी आरबीआयने दिलेले १८०० दशलक्ष नोटा छापण्याचे टार्गेट नाशिकमधील करन्सी नोट प्रेसने पूर्ण केल्याने ५०० रुपयांच्या नोटेची छपाई बंद केली आहे. याचबरोबर केंद्र सरकारने वीस आणि शंभराच्या नोटांची नवीन डिझाइन अद्याप मंजूर न केल्यामुळे या नोटांची छपाई नाशिकरोड प्रेसमध्ये १एप्रिलपासून थांबली आहे.

मध्य प्रदेशातील देवास करन्सी नोट प्रेसला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २०० रुपयांच्या नोटा छापण्याचे आदेश दिल्याने नाशिकमधील प्रेसने २०० रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली आहे. नाशिकमधील प्रेस सध्या १० व ५० रुपयांच्या नोटांची छपाई करते आहे.

Leave a Comment