रिलायन्स जिओ जपानी बँकांकडून घेणार सामुराई कर्ज


दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनी रिलायन्स जिओ ने ३२५० कोटी रुपयांच्या सामुराई कर्जासाठी जपानी बँकांबरोबर करार केल्याची माहिती मिळाली आहे. सामुराई कर्ज हे अगदी कमी व्याजाने दिले जाणारे कर्ज असून रिलायंस जिओ इन्फोकॉम लिमिटेड या पद्धतीचे ५३.५ अब्ज येन इतके कर्ज घेणार आहे. सात वर्षासाठी हे कर्ज घेतले जात असल्याचे समजते.

येनचा सध्याचा दर ६० पैसे प्रती येन आहे. म्हणजे रिलायन्स जिओ ३२५० कोटींचे कर्ज घेणार आहे. मिजुहो बँक, एमयुएफजी बँक, सुमितेमो मित्सुई बँकिंग कार्पोरेशन सिंगापूर शाखा मिळून रिलायन्स जिओ ला हे कर्ज देणार आहेत. यामुळे रिलायंस जिओ असे सर्वाधिक कर्ज मिळविणारी पहिली आशियाई कंपनी बनली आहे. रिलायन्स जिओने मोबाईल व्यवसायात २ लाख कोटींची गुंतवणूक केली असून या कंपनीचे १६.८ कोटी ग्राहक आहेत. हि कंपनी ४ जी सेवा देत आहेच पण भविष्यात ५ जी आणि ६ जी सेवाही देणार आहे.

Leave a Comment