तीन वर्षात ५ जी युजर ११ कोटींवर जाणार


नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार २०२१ पर्यंत ५ जी शिप्मेंत २५५ टक्क्यांनी वाढून युजरचा आकडा ११ कोटीवर जाणार आहे. ५ जीची प्रगती २०१९ मध्ये थोडी संथ असेल मात्र एकदा पायाभूत सुविधा वाढल्या कि हा व्यापार वेगाने गती घेईल असे संकेत मिळत आहेत. जगभर अनेक देशात ५ जी तंत्रज्ञानावर काम सुरु असले तरी अमेरिका, चीन जपान आणि द.कोरिया हे देश सध्या आघाडीवर आहेत तर दुसरीकडे युरोपीय देश रिसर्च पेक्षा हे तंत्रज्ञान रुळण्यासाठी वाट पाहण्यास प्राधान्य देईल असेही या अहवालात नमूद केले गेले आहे.

२०१९ मध्ये ५ जी रोलआउट झाले कि ५ जी स्मार्टफोन व्यापारात वरील चार देश प्रामुख्याने सामील होतील असे या संशोधनाचे प्रमुख पीटर रिचर्डसन याचे म्हणणे आहे. २०१८ ते २०२१ हा काळ ५ जी तंत्र रुळण्यासाठी आणि या बाजारात स्थिरता येण्यासाठी महत्वाचा आहे असेही त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment