सॅमसंगने विद्यार्थी वर्गासाठी आणला बेसिक स्मार्टफोन जे २ प्रो


सॅमसंगने डाटा अॅक्सीस शिवाय वापरता येणारा स्मार्टफोन बाजारात आणला असून हा फोन खास विद्यार्थी वर्गाला नजरेसमोर ठेऊन बनविला गेला आहे. यामुळे फोन वापरला तरी परीक्षा काळात विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होणार नाही असा कंपनीचा दावा आहे. गॅलेक्सि जे २ प्रो असे या फोनचे नाव आहे.

या फोनसाठी वेगळी टेक्निकल फीचर्स दिली गेली आहेत. या फोनला ३ जी, ४ जी अॅक्सेस नाही. त्याऐवजी वायफायच्या सहायाने तो इन्टरनेटला कनेक्ट करता येणार आहे. ज्यांना मोठा डेटा वापरण्याची गरज नाही असे बुजुर्गही हा फोन वापरू शकणार आहेत. या फोनला ८ व ५ एमपी चे अनुक्रमे फ्रंट व रिअर कॅमेरे दिले गेले आहेत. ५ इंचाचा हाय रेझोल्युशन डिस्प्ले, सेल्फी असिस्ट फिचर दिले गेले असून त्यात फेस डिटेक्ट करता येते. फोटो घेण्यासाठी फोकस लॉक करता येतो.

टर्बो स्पीड टेक्नोलॉजीचा हा फोन द. कोरिया मध्ये १८५ डॉलर्स म्हणजे १२ हजार रुपयात मिळतो आहे. विद्यार्थी प्रमोशनल स्कीमसह तो उपलब्ध आहे. त्यानुसार परीक्षा संपताच हाय एंड मॉडेल मध्ये हा फोन एक्स्चेंज करून घेता येणार आहे.

Leave a Comment