चिदंबरमचे नटराज मंदिर


पृथ्वीवर देवांचे देव महादेव यांची अनेक प्रकारची मंदिरे आहेत. तेथे शिव अनेक स्वरुपात विराजमान आहेत. मात्र तामिळनाडू मध्ये असलेले चिदंबरम थल्लई नटराज मंदिर हे प्रमुख शिवमंदीर अनोखे आणि अतिसुंदर म्हणावे लागेल कारण येथे शिव नटराज स्वरूपात आहेत. बहुतेक शिवमंदिरात शिवलिंग असते पण जेथे मूर्ती असेल तेथेही शिव दागदागिने ल्यायलेले नसतात. नटराज मंदिरातील मूर्ती मात्र दागिन्यांनी नुसती लगडलेली आहे. मूर्तीचे सौंदर्य अलौकिक आहे आणि येथेच शिवाने आनंद नृत्य केले होते असा समज आहे.


या मंदिराचा परिसर १ लाख चौरस मीटरमध्ये पसरलेला असून येथील प्रत्येक दगड, खांब शिवाचे वेगळे रूप दाखवितो. या मंदिरात जागोजाग भरतनाट्यमच्या मुद्रा कोरलेल्या दिसतात. मंदिराला नऊ दरवाजे आहेत आणि गोविंदराज, पंडरीगव्वाली मंदिरेही येथे पाहायला मिळतात. शिव आणि वैष्णव दोन्ही देवता एकाच मंदिरात असलेले हे प्राचीन मंदिर आहे. येथे नटराजाचा भव्य रथ असून वर्षातून दोन वेळा यातून नटराजाची मिरवणूक निघते आणि भाविक हा रथ ओढतात. मंदिराला पाच भव्य सभागृहे आहेत.


असे सांगतात कि शिव आणि पार्वती याच्यात एकदा पैज लागली, पैज होती नृत्याची. तेव्हा पार्वतीला नृत्यात कसे हरविता येईल हे विचारायला शिव गोविंद राजास्वामी कडे आले तेव्हा त्यांनी शिवाला एक पाय उचलून नृत्य पोझ घ्या असे सांगितले. हि पोझ महिलांना वर्ज होती त्यामुळे शिवाने हि पोझ घेतली तेव्हा पार्वतीने हार कबुल केली. याच मुद्रेतील शिवमूर्ती येथे आहे.

Leave a Comment