टेलिकॉम क्षेत्रात स्वस्त डेटापॅक आणि फ्री व्होईस कॉलिंग सेवा पुरवून एकच धमाल उडविल्यानंतर आता रिलायन्स जिओ टेलिव्हिजन, ब्रॉडबँड क्षेत्र काबीज करण्यासाठी सज्ज झाले आहे. या सेवा क्षेत्रात जिओ लवकरच उतरत असून त्यासाठी आवश्यक त्या चाचण्या सुरु झाल्या असल्याचे समजते. डीटीएच सेटटॉप बॉक्स नी आयपीटीव्ही सर्विस कंपनी लाँच करणार असून या नव्या सेवेचे नाव जिओ होमटीव्ही असेल असेही समजते.
येतोय जिओ होमटीव्ही
मिडिया रिपोर्टनुसार जिओ होमवर २०० एसडी व एचडी चॅनल्स दिले जातील य सुरवातीची किंमत ४०० रु. असेल. मात्र ग्राहक वाढल्यावर हे दर २०० रुपयांवर आणले जातील असे कंपनीतील अधिकारयांनी सांगितले. काही दिवसापूर्वी मायजिओ अॅप वर जिओ टीव्ही सेग्मेंट दिसत होता. या सेवेसाठीचे दर मोबाईल दरांप्रमाणे खूप स्वस्त असतील असे सांगितले जात असून मोबाईल युजर तसेच टीव्ही प्रेक्षकांना त्याचा मोठा फायदा मिळणार आहे.
केंद्र सरकार मोबाईल पोर्टटीबीलिटी प्रमाणे लवकरच डीटीएच पोर्टटीबीलिटी संपूर्ण देशभर लागू करणार आहे. त्याच्या ट्रायल सुरु झाल्या आहेत. हि सेवा सुरु झाल्यावर लगेच जिओ डीटीएच सुरु होईल असे समजते. यामुळे ग्राहक मिळविणे कंपनीला सोपे जाणार आहे.