करिश्मा कपूरचे शिक्षण ऐकून तुम्हाला बसेल शॉक


उच्चशिक्षित असे बॉलीवूडमध्ये अनेक कलाकार असून अनेक कलाकारांनी बॉलीवूडमध्ये करिअर करत असतानाच आपले शिक्षण देखील पूर्ण केले. पण बॉलीवूडमध्ये काही असे देखील कलाकार आहेत ज्यांनी शिक्षण कमी असताना देखील मोठे यश मिळवले आहे. यात एक अशी बॉलिवूड अभिनेत्री आहे जिचे शिक्षण फक्त पाचवीपर्यंत झाले असून तिने बॉलीवूडमध्ये आपल्या अॅक्टींगने अनेकांच्या मनावर राज्य करते आहे. ती कपूर कुटुंबियांमध्ये सर्वात कमी शिकलेली अभिनेत्री आहे.

फक्त ५ वी पर्यंत बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर ही शिकली असून अनेक दशकांपासून संपूर्ण कपूर कुटुंबिय बॉलीवूडमध्ये आहे. कपूर कुटुंबातील अनेक जण हे १० ते १२ पर्यंतच शिकलेले आहेत. त्यात करिश्मा फक्त ५ वी पर्यंत शिकली आहे. यामागे देखील एक कारण आहे. करिश्मा कपूरचा कैदी हा पहिला चित्रपट होता. शूटिंगदरम्यान ती ६ वी मध्ये शिकत होती. त्यावेळेस तिने अभिनयामध्ये करिअर करण्यासाठी भर दिला आणि शिक्षणाकड़े दुर्लक्ष केले. त्यामुळे ती फक्त ५ वी पर्यंत शिकली.