सुधीर मुनगंटीवारांनी मागितली उद्धव ठाकरेंच्या भेटीची वेळ


मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये सत्तेतील विरोधक शिवसेना आणि भाजपचे पॅचअप होणार का?, सध्या याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कारण आज संध्याकाळी मातोश्रीवर भाजप नेते व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता असून युतीच्या प्रस्तावावर या भेटीदरम्यान चर्चा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

भाजप आणि शिवसेनेतील युतीसाठी आगामी निवडणुका डोळ्यासंमोर ठेवून हालचाली सुरु झाल्या आहेत. सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभा निवडणूक एकत्रित लढवण्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितल्याचे बोलले जात आहे. पण अद्याप भेट निश्चित झाली नाही. भेटीसाठी उद्धव ठाकरेंकडून वेळ दिला गेल्यास, संध्याकाळी पाच वाजता ‘मातोश्री’वर या दोघांचीही भेट होईल. त्यामुळे भेटीकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिले आहे.