राष्ट्रवादी काँग्रेसवर राम शिंदेची जहरी टीका


शिंदेखडा : भाजप शिवसेनेवर बोलायची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची औकात नसल्याची जहरी टीका राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी केली आहे. राम शिंदे धुळे जिल्ह्यतील शिंदेखडा येथे पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांची बुराई नदी परिक्रमा समाप्ती कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते.

त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचा चांगला समाचार घेतला. परिवाराचा सर्वांगीण विकास या दोन्ही पक्षांनी केला असल्याची टीकाही त्यांनी केली. एवढी वर्ष सत्तेचा डल्ला खाणाऱ्यांनी हल्लाबोल केला आहे, पण लोकांना सर्व कळत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान मंत्रीमंडळात लवकरच मंत्री जयकुमार रावल यांना बढती मिळेल असे संकेतही त्यांनी यावेळी दिले.