प्रियंका चोप्राचा हा ड्रेस आहे लाखमोलाचा


आपल्या महागड्या वस्तूंमुळे बॉलीवूडमध्ये कलाकार नेहमी चर्चेत असतात. बॉलीवुड अभिनेत्रींचे यामध्ये नाव सर्वात पुढे आहे. आपल्या कपड्यांमुळे प्रियंका चोप्रा नेहमी चर्चेत असते. ती नुकत्याच एका कार्यक्रमात दिसली होती. त्या इवेंटसाठी तिने खाल निळा रंगाचा जंपसूट घातला होता. प्रियंका या जंपसूटमध्ये खूपच कूल दिसत आहे. पण या ड्रेसची किंमत ऐकली तर तुम्हाला ही धक्का बसेल. जवळपास १,४६,३५० रुपये प्रियंकाच्या या ड्रेसची किंमत असून देसी गर्लची फॅशन आणि तिची पसंद वेगळी आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियंकाने किड लाइक जॅकचा ट्रेलर रिलीज केला. याशिवाय तिची आगामी टीव्ही सीरीज क्वाटिंको देखील लवकरच सुरु होणार आहे.