कमलनाथ म्हणतात; बलात्कार जनता पार्टी असे असायला हवे भाजपचे नाव


नवी दिल्ली – सध्या देशभरात सुरु असलेल्या कठुआ आणि उन्नाव पाशवी बलात्कार प्रकरणावरुन भरपूर वादंग निर्माण झाले आहे. भाजपशी संबंधीत नेते यामध्ये संशयीत आरोपी असल्याने सर्वच स्तरातून भाजपवर टीका होत आहे. त्यातच भाजपवर जिव्हारी लागणारा वार काँग्रेस नेते कमलनाथ यांनी केला आहे. भाजपचे नाव बलात्कारी नेत्यांमुळे बलात्कार जनता पार्टी असे असायला हवे, अशा शब्दांत त्यांनी कठोर टीका केली आहे.

कमलनाथ म्हणाले, कुठेतरी मी वाचले होते की, असे २० नेते भाजपचे आहेत, बलात्कारासंबंधी गुन्ह्यांशी ज्यांची नावे जोडलेली असल्यामुळे या पक्षाचे नाव आता भारतीय जनता पार्टी असावे की, बलात्कार जनता पार्टी असायला हवे याचा विचार जनतेनेच करावा. भाजपला कमलनाथ यांचे हे वक्तव्य चांगलेच झोंबू शकते. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये पुन्हा आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.