कठुआ बलात्कारातील आरोपी म्हणतात आमची नार्को चाचणी करा


श्रीनगर: आज स्थानिक न्यायालयात कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणी सुनावणी झाली. यावेळी मुख्य आरोपी सांझीरामने न्यायालयात आम्हा सर्वांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी केली. तसेच आम्हाला आरोपपत्र मिळाले नसल्याचेही आरोपींनी म्हटले आहे. मग न्यायालयाने आरोपींच्या वकिलांना आरोपपत्र देण्याचे आदेश पोलिसांना दिले.

एकूण आठ आरोपी या बलात्कार आणि हत्या प्रकरणात असून त्यापैकी एक जण अल्पवयीन असल्यामुळे सात आरोपींना सत्र न्यायालयात आणि एका आरोपीला ज्युवेनाईल न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, आरोपींनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळत, नार्को टेस्टमध्ये सर्व काही सिद्ध होईल, असा दावा केला. याप्रकरणी पुढची सुनावणी २८ एप्रिलला आहे.

Web Title: Kathua rape and murder case: Accused demands narco analysis test