पंजाबविरुद्धच्या सामन्यात धोनीने ‘जे’ आठ हंगामात जमले नाही ‘ते’ करुन दाखवले


मोहाली – महेंद्रसिंह धोनीला किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जमध्ये झालेल्या सामन्यात सुर गवसल्याचे पाहायला मिळाले. पण त्याला संघाला विजय मिळवून देण्यात यश आले नाही. चेन्नईचा पंजाबने ४ धावांनी पराभव केला. पण धोनीने या सामन्यात असे काही केले जे त्याला गेल्या आठ आयपीएल हंगामामध्येही जमले नाही.

आपल्या मॅच फिनीशींग फलंदाजी आणि अचूक विकेटकिपींगसाठी चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी जाणला जातो. रविवारी पंजाबविरुद्धच्या सामन्यात धोनीने ४४ चेंडूंत ६ चौकार आणि ५ षटकारांच्या जोरावर नाबाद ७९ धावांची खेळी केली. ही धोनीची खेळी आजवरच्या त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोकृष्ट खेळी आहे. धोनीने यापूर्वी आयपीएल २०११ मध्ये ७० धावा करत सर्वोकृष्ट खेळी केली होती. धोनीला स्वत:चा हा विक्रम मोडण्यासाठी तब्बल आठ वर्षे वाट पाहावी लागली. आजवर आयपीएलमध्ये धोनीने १६२ सामन्यामध्ये ३८.२२ च्या सरासरीने ३६७० धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट १३६.८८ चा आहे. धोनी ने आयपीएलमध्ये १८ अर्धशतके झळकावली आहेत.