आता दीपिकाला ही खोलायचे आहे स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस


अनुष्का शर्मा आणि प्रियांका चोप्रानंतर आता बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पादुकोण सुद्धा प्रॉडक्शन हाऊस खोलणार आहे. आता ती यशस्वी अभिनेत्रीसोबतच एक यशस्वी निर्मातीही बनू इच्छित आहे.

‘NH 10’, ‘फिलौरी’ आणि ‘परी’ सारख्या चित्रपटांची अनुष्का शर्माच्या ‘क्लीन स्लेट’ पिक्चर्सने निर्मिती केली आहे. याशिवाय प्रियांका चोप्राचे पर्पल पेबल प्रॉडक्शन हाऊस आहे. दीपिकाने यापूर्वी अनेकदा निर्माती बनण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. तिने २०१५ मध्ये दिलेल्या मुलाखतीत माझे प्रॉडक्शन हाऊस मी उघडू इच्छिते. मला या माध्यमातून हव्या तशा विषयांवर चित्रपट बनवण्याची इच्छा आहे. माझ्यासाठी हे एक्साइटींग असेल. नवे काही करण्याची संधी मला यामुळे मिळेल, असे ती म्हणाली होती.

विशाल भारद्वाज यांच्या ‘सपना दीदी’ या चित्रपटात दीपिका दिसणार आहे. दीपिकासोबत यात इरफान खानचे नाव फायनल झाले होते. पण, या चित्रपटाचे शूटींग सुरू होण्याआधीच इरफानच्या आजाराची बातमी आली. त्यामुळे ‘सपना दीदी’चे शूटींग पुढे ढकलण्यात आले आहे.