गेलने सार्थ ठरवला सेहवागचा निर्णय !


चंदीगड: किंग्स इलेव्हन पंजाबने आयपीएलच्या चुरशीच्या सामन्यात ख्रिस गेलच्या वादळी खेळीमुळे चेन्नई सुपर किंग्सवर अवघ्या चार धावांनी विजय मिळवला.

यंदाच्या मोसमातला ख्रिस गेलने आपला पहिलाच सामना खेळताना दमदार अर्धशतकी खेळी केली. ३३ चेंडूत सात चौकार आणि चार षटकारांसह त्याने ६३ धावा फटकावल्या. किंग्स इलेव्हनला गेलच्या या खेळीमुळे २० षटकांत सात बाद १९७ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. धोनीच्या चेन्नईला या आव्हानाचा पाठलाग करताना ५ बाद १९३ धावाच करता आल्या. नाबाद ७९ धावा करत धोनीने एकाकी झुंज दिली. धोनीने सहा चौकार आणि पाच षटकार लगावले, मात्र त्याच्या खेळीला विजयी टिळा लागला नाही.