ह्या देशामध्ये बर्गरपेक्षा स्वस्त पेट्रोल !


आपल्या जगामध्ये अतिश्रीमंत असे अनके देश आहेत. ह्यातीलच एक म्हणजे कतार हा देश. ह्या देशाच्या वैभवाबद्दल सर्वांनाच माहिती आहे. अतिशय धनाढ्य समजला जाणारा हा देश आहे. तसेच पेट्रोलची ह्या देशामध्ये अजिबात चणचण नाही. किंबहुना ह्या देशामध्ये पेट्रोल इतक्या विपुल मात्रेमध्ये उपलब्ध आहे, की त्यांची किंमत एखाद्या बर्गरपेक्षा देखील स्वस्त आहे.

ह्या देशामध्ये सुप्रद्सिद्ध फूड चेन मॅकडोनाल्डमध्ये मिळणाऱ्या एका बर्गरची किंमत भारतीय चलनाप्रमाणे सुमारे शंभर रुपये इतकी आहे, तर एक लिटर पेट्रोलची किंमत अवघी सतरा रुपये प्रती लिटर आहे. जगातील सर्वात मोठा पेट्रोलचा साठा ह्याच देशाकडे आहे. अमेरिकेमधील कनेक्टीकट शहरापेक्षा लहान असलेला हा देश, त्यामध्ये असणाऱ्या पेट्रोलच्या साठ्यामुळे किती श्रीमंत असेल ह्याची कल्पना आपण करू शकतो.

सर्वात जास्त उत्पादन क्षमता आणि अतिशय चैनीचे जीवन जगणारे धनाढ्य नागरिक कतार देशामध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. देशाच्या मालकीची जी संसाधने उपलब्ध आहेत, त्यांच्या द्वारे मिळालेला पैसा सरकारतर्फे नागरिकांच्या साठी वापरला जात असतो. त्यामुळे ह्या देशामध्ये पाणी, वीज किंवा हेल्थ केअर सारख्या जीवनावश्यक गोष्टीसाठी नागरिकांना पैसे खर्च करावे लागत नाहीत. तसेच निवृत्त लोकांना दरमहा चेक द्वारे सरकार कडून निवृत्तीवेतन दिले जाते.

ह्या देशाची लोकसंख्या केवळ बावीस लाख आहे, पण त्यातील केवळ पंधरा टक्के लोक कतारचे कायदेशीर नागरिक आहेत. बाकी ८५ टक्के लोक व्यवसायाच्या किंवा पर्यटनाच्या निमित्ताने येथे राहिलेले आहेत. ह्या देशामध्ये मद्य मना आहे, पण काही हॉटेल्स कायदेशीर परवान्याअंतर्गत मद्याची विक्री करतात. वृद्धांच्या मानाने तरुणांची संख्या जास्त असणाऱ्या देशामध्ये बायकांच्या मानाने पुरुषांची संख्या जास्त आहे. एकूण जनसंख्येतील केवळ १.५ टक्के लोक ६४ वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत.

कतार देशामध्ये महिलांना फारसें स्वातंत्र्य नाही. येथे गाडी चालविण्याचे स्वातंत्र्य महिलांना असले, तरी वेशभूषेचे स्वातंत्र्य मात्र महिलांना नाही. त्यांना येथे पारंपारिक वेशभूषेमधेच राहावे लागते.

Leave a Comment