पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा अपमान करणाऱ्याला जगातून गायब करू: भाजप खासदार


नवी दिल्ली – पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य मध्य प्रदेशमधील शाजापूर जिल्ह्याचे भाजप खासदार मनोहर उंटवाल यांनी केले असून त्यांनी आमच्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा जो अपमान करेल त्याला या जगातून गायब करू, असा इशाराच दिला. ते शेतकरी सन्मान यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. मनोहर उंटवाल यांची यापूर्वी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्या पत्नीबाबत वक्तव्य करतानाही जीभ घसरली होती. जो कोणी आमच्या पंतप्रधानांचा अपमान करेल त्याची जागा आमच्या पायात असेल. आमच्या मुख्यमंत्र्यांचा जो अपमान करेल त्याला तर या जगातून गायब करण्याची आमची ताकद आहे, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. उंटवाल यांचे हे वक्तव्य भाषणापेक्षा धमकी देण्यासारखे वाटत होते.