बलात्का-यांना फाशी देण्यासाठी मी जल्लाद बनण्यास तयार : आनंद महिंद्रा


मुंबई: देशभरात उत्तर प्रदेशातील उन्नाव आणि जम्मू काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील बलात्काराच्या घटनांनी खळबळ उडाली असून अनेकजण रस्त्यावर उतरुन निषेध नोंदवत आहेत, तसेच दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनीही याबाबत आता आवाज उठवला आहे. कठुआ बलात्काराच्या घटनेने चिडलेल्या आनंद महिंद्रा यांनी आपला राग ट्विटरवर व्यक्त केला आहे.


मी बलात्काऱ्यांना फाशी देण्यासाठी फाशी देणारा जल्लाद होण्यास तयार असल्याचे आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे. आनंद महिंद्रा म्हणाले, कोणालाही जल्लादची नोकरी हवी हवीशी वाटत नाही. पण बलात्कारी आणि लहान मुलींना ठार मारणाऱ्यांना जर शिक्षा द्यायची असेल, तर ही नोकरी मी आनंदाने स्वीकारेन. शांत राहण्याचा मी प्रयत्न करतो, पण आपल्या देशातील अशा घटनांमळे माझे रक्त खवळते.

Web Title: Anand Mahindra on rape, "I am ready to be hanged to hang rapists"