आदर्श शिंदेंच्या ‘संभळंग ढंभळंग’ची जोरदार चर्चा


सध्या सगळीकडे आदर्श शिंदे यांच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘संभळंग ढंभळंग’ ह्या गाण्याची जोरदार चर्चा सुरु असून हे गाणे गणेश निगडे यांनी स्वरबद्ध केले असून श्रावणी सोळस्करांनी दिग्दर्शित केलेले ‘संभळंग ढंभळंग’ गाण्याची निर्मिती ‘टियाना’ प्रॉडक्शन्सने केली आहे. अगदी कमी काळात लोकांनी ह्या गाण्याला अक्षरशः डोक्यावर घेतलेय.

याबाबत ‘टियाना’ प्रॉडक्शन्सचे सुजित जाधव म्हणतात, युवा आणि महत्वाकांक्षी दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार आणि प्रोड्यूसर्स असे आम्ही एकत्र आलो आहोत. ‘प्रीत तुझी’ हा आमचा पहिला मराठी संगीत अल्बम असून जो याच महिन्यात लॉन्च होणार आहे. ‘संभळंग ढंभळंग’ हे ‘प्रीत तुझी’ अल्बम मधील ४ गाण्यांपैकी एक गाणे असून मराठी प्रेक्षकांसाठी आमचे बोधवाक्य दर्जेदार मनोरंजन तयार करणे आहे.