निवडणुकीपूर्वी पुन्हा नोटबंदी?


लोकसभेच्या निवडणुका आता वर्षावर आल्या आहेत. या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा नोटबंदी जाहीर करतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. ८ नोवेंबर २०१६ साली रात्री आठ वाजत अचानक पंत्प्रदाह्न मोदी यांनी ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या होत्या. आता पुन्हा एकदा हाच प्रयोग होण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले जात आहेत.

यामागे कारण दिले जात आहे ते २ हजार रुपयांच्या नोटांचे. या नोटा गेले काही दिवस चलनातून गायब होत आहेत याचा अर्थ त्यांची साठवणूक केली जात आहे असा संशय व्यक्त केला जात आहे. रिझर्व बंकेकडून अन्य बँकांना होणारा २ हजार रुपयांच्या नोटांचा पुरवठा कमी केला गेला आहे आणि त्यामुळे बँक आणि एटीएम मधेही नोटांची चणचण जाणवत आहे.

रिझर्व बँकेने ५०, १० व २०० रुपये चलनाच्या नव्या नोटा मोठ्या प्रमाणावर आणल्या असल्या तरी या नोटांसाठी एटीएममध्ये सोय झालेली नाही. रिझर्व बँकेने नोटबंदी नंतर २ हजार रुपयांच्या ७ लाख कोटी नोटा, ५०० रुपयांच्या ५ लाख कोटी नोटा चलनात आणल्या आहेत मात्र सध्या त्यातील ९ ते १४ टक्केच नोटा चलनात आहे असे दिसून आले आहे. याचा अर्थ बाकी नोटा साठविल्या गेल्या आहेत असा निघतो असे एक बँक अधिकारी म्हणाले. २०० रुपयांच्या १ लाख कोटी नोटा चलनात आणल्या जात आहेत. मागील नोटबंदीच्या वेळी मोठ्या रकमेच्या नोटा चलनातून काढून घेतल्या जातील असे स्पष्ट संकेत दिले गेले होते यामुळेच आता कोणत्याची क्षणी पुन्हा नोटबंदीची घोषणा होऊ शकेल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment