गुगलमध्ये मृत्युनंतरही कर्मचाऱ्यांना दिला जातो पगार


ज्या कंपनीत कर्मचाऱ्यांची सर्वतोपरी काळजी घेतली जाते ती कंपनी नोकरीसाठी योग्य असे मानले जाते आणि अश्याच एखाद्या कंपनीत नोकरी मिळावी अशी जवळजवळ प्रत्येकाची इच्छा असते. अर्थात बहुतेक कंपन्या तुम्ही जोपर्यंत तेथे काम करता तोपर्यंत तुमची सर्वतोपरी काळजी घेतातही पण काही कारणाने कर्मचार्याला मृत्यू आला तर त्याच्या कुटुंबाची काळजी घेणाऱ्या किती कंपन्या असतील? जगभरात लोकप्रिय असलेली सर्वात मोठी सर्च इंजिन कंपनी गुगल अश्यापैकी एक आहे.

कंपनीचे चीफ पिपल ऑफिसर लेस्जोल बोक फोर्ब्स मासिकाला दिलेल्या मुलाखतील म्हणाले आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांची काळजी त्याच्या हयातीत आणि मृत्युनंतरही घेतो. म्हणजे जोपर्यत एखादा कामचारी आमच्या सेवेत आहे तोपर्यंत त्याला सर्व सुविधा मिळतातच पण काही कारणाने कामावर असतानाच त्याला मृत्यू आला तर त्यानंतर १० वर्षे त्याच्या कुटुंबाला निम्मा पगार घरपोच दिला जातो. इतकेच नव्हे तर १९ वर्षाखालील मुले असतील तर ती १९ वर्षाची होईपर्यंत त्यांना दरमहा १ हजार डॉलर्स दिले जातात.

हा नियम सर्व कर्मचार्यांसाठी समान आहे. मग तुम्हाच्या नोकरीला एक वर्ष झालेले असो अथवा १० वर्षे झालेली असोत. त्यामुळेच गुगल मध्ये नोकरी करावी असे अनेकांचे स्वप्न असते.

Leave a Comment