अलिशान किल्ल्यात वास्तव्य शिवाय दणदणीत पगार


अलिशान किल्ल्यात वास्तव्य करायचे आणि शिवाय वर्षाला २२ ते २६ लाख रुपये पगार मिळवायचा अशी संधी आली आहे मात्र आता त्यासाठी केवळ दोन दिवस राहिले आहेत. होय अशी संधी खरोखरच आली आहे पण ती आहे इंग्लंड मध्ये. राजा राणीचे किल्ले आणि महाल आपण अनेकदा पहिले असतील. अश्याच एका सुंदर बेटावर असलेल्या कॉर्नवोल या सुंदर जागी सेंट मायकल माउंट किल्ल्यावर काम करण्यासाठी या किल्ल्याच्या व्यवस्थापनाला उमेदवार हवे आहेत.


व्यवस्थापनाने त्यांना हव्या असलेल्या उमेदवारांसाठी जाहिरात दिली असून त्यात कामाचे स्वरूप दिले आहे. त्यानुसार येथे येणाऱ्या पर्यटकांच्या कार पार्किंग पासून त्यांना आवश्यक त्या सर्व सेवा देण्यावर लक्ष ठेवणे हे मुख्य काम आहे. त्याच्बोबर येथे अगोदरच तैनात असलेले ३० कर्मचारी त्याचे काम चोख करतात वा नाही यावरही नजर ठेवायची आहे. त्यासाठी या किल्ल्यात वास्तव्य आणि भलामोठा पगार मिळणार आहे.

काम किरकोळ वाटले तरी ते सोपे नाही. कारण या किल्ल्याला गतवर्षी तब्बल ३ लाख पर्यटकांनी भेट दिली आहे हे लक्षात घेतले पाहिजे. पण तरीही अर्ज करायचा असेल तर त्यासाठी १७ एप्रिल हि शेवटची तारीख आहे. बाकी सर्व माहिती किल्ला व्यवस्थापनाच्या वेबसाईटवर आहेच. अगदी नोकरीचे जमत नसेल तर पर्यटक म्हणून हा किल्ला सुंदर आहेच.

Leave a Comment