अक्षयतृतीयेला सोने घेणार उसळी


येत्या १८ एप्रिलला देशभरात अक्षयतृतीय साजरी होत असताना या मुहूर्ताच्या निमित्ताने सोने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना सोन्यासाठी जादा पैसे मोजावे लागतील असे दिसत आहे. अनेक वर्षानंतर ही अक्षयतृतीया सोन्याचे भाव सर्वाधिक असलेली ठरेल असे संकेत मिळत आहेत. गेली काही वर्षे साधारण ३० हजार रु. १० ग्राम असे दर आहेत मात्र यंदा ते ३२ हजाराची पातळी पार करतील असे सराफ बाजारातून सांगितले जात आहे.

हिरे खरेदीत आलेली मंदी आणि अमेरिकेने सिरीयावर केलेले हवाई हल्ले या दोन्हीच्या एकत्रित परिणामामुळे केवळ भारतातच नाही तर जागतिक पातळीवर सोन्याचे दर वाढले आहेत. सध्या हे भाव ३२३०० वर आहेत. भारतात अक्षयतृतीयेला कमी अधिक प्रमाणात सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण खूप मोठे आहे यामुळे या दिवशी सोने दर नक्कीच चढे असतील असे संकेत मिळत आहते. बुलीअन फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव हरेश आचार्य म्हणाले आणखी दोन दिवस सोन्याची दरवाढ अशीच सुरु राहिली तर अक्षयतृतीया सोन्यासाठी महाग ठरणार. न्युयोर्क बाजारातही सोने दर चढले आहेत असे ते म्हणाले. गतवर्षी अक्षयतृतीयेला सोन्याचा दर २८८६१ होता.

Leave a Comment