रॉयल चॅलेंजरची हिरवी जर्सी काय संदेश देते?


रविवारी रॉयल चॅलेंजर बंगलोर आणि राजस्थान रॉयल मध्ये झालेला सामना राजस्थानने जिंकला असला तरी या सामन्यात रॉयल चॅलेंजरचा संघ हिरवी जर्सी घालून खेळला. २०११ पासून आत्तापर्यंत प्रत्येक सिरीज मध्ये या संघाने एका सामन्यात ही जर्सी घातली आहे. यामागचे कारण अनेकांना माहिती नसेल. हिरवी जर्सी या संघासाठी फारशी लकी नाही हे अगोदरच नमूद करायला हवे. ही जर्सी घालून खेळलेल्या ७ सामन्यापैकी फक्त दोन सामने हा संघ जिंकू शकलेला आहे तरीही ही जर्सी आवर्जून वापरली जाते ती पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी.

जगभरात पर्यावरणाची समस्या उग्र रूप धारण करते आहे त्याबाबत रॉयल चॅलेंजर्स जनमाणसात जागृती करू पाहत आहेत. हिरव्या रंगाची ही जर्सी या संघाच्या सामान्यादरम्यान स्टेडीयम मध्ये पाण्याच्या ज्या रिकाम्या बाटल्या फेकून दिल्या जातात त्याचा वापर करून बनविली जाते. यासाठी ११ हजार प्लास्टिक बाटल्या गोळा केल्या जातात आणि रिसायकल करून त्यापासून इको फ्रेंडली हायएंड कपडा बनविला जातो. या कपड्यापासून हि जर्सी बनते.