…तर 2030 पर्यंत बर्बाद होईल बंगळूरु – शास्त्रज्ञांचा इशारा


बंगळूरु शहरात ज्या गतीने रस्त्यावरची वाहने वाढत आहेत ते पाहता वर्ष 2030 पर्यंत हे शहर राहण्यालायक उरणार नाही. ते बर्बाद होईल, अशा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेने केलेल्या एका संशोधनानुसार बंगळूरुच्या वाहन विभागाने टिकाऊ उपाय शोधला नाही तर हे शहर उध्वस्त होईल.

बंगळूरु शहरात दररोज 2,000 हजार नव्या गाड्यांची नोंदणी होते. यात मोटारी व दुचाकींचा समावेश आहे अशी आकडी देऊन वाहनांच्या वाढत्या संख्येवर या अहवालात खास भर देण्यात आला आहे. या वाहनांमुळे वायू उत्सर्जन आणि कार्बन डाय ऑक्साईड यांचे प्रमाण दररोज वाढत आहे, असे त्यात म्हटले आहे.

या पाहणीचे नेतृत्व करणारे प्रोफेसर आशिष वर्मा यांच्या मते, या संशोधनात ही समस्या कायमस्वरूपी संपविण्याच्या उपायांची चर्चाही करण्यात आली आहे. काही रस्त्यांना कार-फ्री घोषित करणे, सायकिलिंगच्या सुविधेला प्रोत्साहन देणे, वन-वे कॉरिडोर तयार करणे असे अनेक उपाय त्यात सुचविण्यात आले आहे.

मुंबईत वाहन विकत घेताना अतिरिक्त कर गेली 52 वर्षे वसूल करण्यात येत आहे. तसा कर लावण्याची शिफारसही अहवालात करण्यात आली आहे.