जनतेला न्याय हवा असेल, तर राज्यघटनेच्या पुनर्तपासणी आवश्यक – सत्यपाल सिंह


नवी दिल्ली – देशातील जनतेला न्याय हवा असेल, तर राज्यघटनेच्या पुनर्तपासणीची गरज असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी केल्यामुळे भाजप अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. सिंह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिल्ली विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

राज्यघटनेत गेल्या काही दशकात हस्तक्षेप करण्यात आला असल्यामुळे राज्यघटनेच्या पुनर्तपासणीची पुन्हा एकदा गरज आहे. सिंह यांनी राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेवरदेखील शंका उपस्थित केली. बहुसंख्याक आणि अल्पसंख्याकासाठी असणाऱ्या कायद्यात फरक आहे. तसेच बहुसंख्याकांना अल्पसंख्याकांच्या तुलनेत कमी स्वातंत्र्य असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे.