मधुमेह नियंत्रित ठेवण्याकरिता करा अॅलोव्हेराचा (कोरफड) उपयोग


अॅलो व्हेरा, म्हणजे कोरफडीचा उपयोग त्वचेचे तसेच केसांचे सौंदर्य वाढविण्याकरिता केला जातो. तसेच कोरफडीच्या रसाचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगले आहे. कोरफडीचे सेवन नियमितपणे दोन महिन्यांकरिता केले असता, मधुमेहावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे, असे अनेक शोधांच्या द्वारे सिद्ध करण्यात आले आहे. कोरफडीमध्ये इमोडीन नामक तत्व असते, जे शरीरातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यास सक्षम असते. कोरफडीचे सेवन नियमाने केल्याने शरीराला दोन तऱ्हेचे फायबर प्राप्त होत असते. मुसिलेज आणि ग्लुकोमेनन ही ती दोन तऱ्हेची फायबर्स आहेत. ही फायबर्स भूक लवकर शमविण्यास सहायक असून परिणामी वजन घटविण्यासही सहायक आहेत.

कोरफडीमध्ये क्रोमियम आणि मँगनीझ ही तत्वे देखील आहेत. ह्या तत्वांमुळे शरीरातील इंस्युलीनची पातळी नियंत्रित राहते आणि मधुमेह होण्यापासून बचाव होतो. आरोग्याच्या दृष्टीने अधिकाधिक फायदे मिळविण्यासाठी बाजारात उपलब्ध असणाऱ्या कोरफडीच्या गराचा किंवा रसाचा वापर करण्याऐवजी ताज्या कोरफडीचा उपयोग करणे जास्त श्रेयस्कर आहे. दररोज दोन लहान चमचे कोरफडीचा ताज्या गराचे सेवन केल्याने शरीरामध्ये असलेले साखरेचे प्रमाण पुष्कळ अंशी कमी होण्यास मदत मिळते.

मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना कोणत्याही कारणाने झालेली लहानशी जखम देखील भरून येण्यास खूप वेळ लागतो. ह्यावरही कोरफड उपयुक्त आहे. कोरफडीचा गर सरळ जखमेवर लावल्याने जखमेमुळे होणारी आग किंवा वेदना कमी होतात, व जखम लवकर भरून येण्यास मदत मिळते. मधुमेहावर संपूर्णपणे नियंत्रण मिळविण्यासाठी योग्य, संतुलित आहार आणि व्यायाम यांची आवश्यकता आहे. आपला आहार आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने ठरविलेला असावा. योग्य आणि संतुलित आहाराच्या जोडीने कोरफडीचे नियमित केलेले सेवन मधुमेह नियंत्रित ठेवण्यास सहायक ठरते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment