सलग तिसऱ्या वर्षी पगार नाही घेणार ट्विटरचा सीईओ


ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी सलग तिसऱ्या वर्षी पगार न घेण्याची घोषणा केली आहे. इतकेच नव्हे तर एक पैसाही घेण्यास त्यांनी नकार दिला आहे.

अमेरिकी सुरक्षा आणि विनिमय आयोगापुढे (एसईसी) ट्विटरने नियमानुसार आपले विवरण सादर केले आहेत. त्यात कंपनीने म्हटले आहे, की “ट्विटरच्या दीर्घकालीन मूल्य सृजनाच्या क्षमतेबाबत आपली प्रतिबद्धता आणि भरवशामुळे जॅक डोर्सी यांनी 2017 साली कोणतेही वेतन घेण्यास नकार दिला आहे.” याच तपशीलांमुशे ट्विटरचे मुख्य वित्त अधिकारी नेद सहगल यांनी 2017 साली 1.43 कोटी डॉलरचे वेतन घेतले.

मात्र डोर्सी यांच्याकडे कंपनीचे शेअर्स असून त्यांचे मूल्य 2018 च्या सुरूवातीपर्यंत 20 टक्क्यांनी वाढले आहे. “डोर्सी यांच्याकडे 2 एप्रिलपर्यंत कंपनीचे 1.8 कोटी शेअर होते. त्यांची सध्याची किंमत 52.9 कोटी डॉलर आहे. त्यांच्याकडे असलेल्या एकूण शेअरचा वाटा 2.39 टक्के आहे,” असे व्हरायटी या नियतकालिकाने म्हटले आहे.

ट्विटरचे 30 कोटीपेक्षा अधिक वापरकर्ते आहेत, मात्र ट्विटरला सध्या वापरकर्त्यांची मंदावलेली वाढ आणि महसुलातील घट भेडसावत आहे, असे डोर्सी यांनी जानेवारी महिन्यात म्हटले होते.

Leave a Comment