आजपासून भीम अॅप यूजर्सना मिळणार कॅशबॅक


नवी दिल्ली – आजपासून म्हणजे १४ एप्रिल आंबेडकर जयंती दिवसापासून भीम अॅपचा वापर करणाऱ्यांना कॅश बॅकचा लाभ मिळणार असून आजपासून बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित भीम अॅपवर आकर्षक कॅश बॅक योजनेची सुरुवात होणार आहे.

ग्राहकांना भीम अॅपच्या कॅशबॅक ऑफरमध्ये एका महिन्यात ७५० रुपये आणि व्यापाऱ्यांना एका महिन्यात १ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकते. BHIM म्हणजे भारत इंटरफेस फॉर मनी (Bharat Interface For Money) भारत सरकारच्या नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे संचालित केले जाते. केवळ २ एमबीच्या या अॅपला काही सेकंदामध्ये Android किंवा आयफोनमध्ये डाउनलोड केले जाऊ शकते. या अॅपचे असे डिजाईन तयार केले गेले आहे, की पहिल्यांदा वापर करणाराही हे अॅप चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. भीम अॅप वापर करण्यासाठी आवश्यक आहे, तुमचे बँक खाते नंबर तुमच्या मोबाईल नंबरशी जोडलेले असणे.

Leave a Comment