केळी लवकर खराब होऊ नयेत यासाठी हे उपाय अवलंबा


केळे हे फळ फारसे टिकणारे नाही. थंडीच्या दिवसांमध्ये केळी साधारण आठवडा भरापर्यंत ठीक राहतात. पण एकदा का केळी पिकू लागली, की मग मात्र लवकर संपवावी लागतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर केळी तीन चार दिवसांपेक्षा जास्त टिकत नाहीत. या दिवसांत केळी लवकर पिकतात, काळी पडू लागतात, आणि सडूही लागतात. त्यामुळे केळी अनेक दिवसांपर्यंत ताजी कशी ठेवता येतील ह्याचे काही घरगुती उपाय करून पाहता येतील.

केळी आणल्यानंतर प्रत्येक केळे देठासकट वेगळे करून प्रत्येक केळ्याच्या देठाभोवती प्लास्टिक गुंडाळावे. असे केल्याने केळी लवकर खराब न होता जास्त काळ ताजी राहतात. केळी ताजी ठेवण्याकरिता विटामिन सी च्या गोळ्यांचा वापर करता येईल. ह्या गोळ्या कोणत्याही औषधांच्या दुकानामध्ये अगदी सहज उपलब्ध असतात. एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी भरून घेऊन त्यामध्ये विटामिन सी च्या तीन चार गोळ्या टाकाव्यात. ह्या गोळ्या पाण्यामध्ये विरघळल्यानंतर त्यामध्ये केळी बुडवून ठेवावीत. दोन तीन मिनिटे केळी पाण्यामध्ये बुडवून ठेवल्यानंतर बाहेर काढावीत आणि नेहमीप्रमाणे, रूम टेम्परेचर वर राहू द्यावीत.

सोडा वॉटर देखील केळ्यांचा ताजेपणा जास्त वेळ टिकवून ठेवण्यासाठी सहायक आहे. ह्याचा वापर प्रीझर्व्हेटिव्ह म्हणून केला जातो. केळी सोडा वॉटर मध्ये बुडवून बाहेर काढून नेहमी प्रमाणे राहू दिल्यास ती लवकर पिकून खराब होत नाहीत. तसेच आंबट चवीच्या फळांमध्ये सायट्रिक अॅसिड असते. त्यामुळे पाण्यामध्ये लिंबू किंव संत्रे पिळून त्यामध्ये केळी बुडवून ठेवावीत. त्यामुळे देखील केळ्यांचा ताजेपणा टिकून राहण्यास मदत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment