सिडनीमध्ये सुरु झाले जगातील पहिले टॉपलेस सलून


ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमधील एक अनोखे सलून जगभरात प्रसिद्ध झाले असून येथे कटिंग आणि दाढी करण्यासाठी मोठी रांग असते. लोक कित्येक तास आपली वेळ येण्याची प्रतीक्षा करतात. पण दुसऱ्या दुकानात अजिबात जात नाहीत.

आता मात्र तुमचा गोंधळ उडला असेल, असे काय आहे या सलूनमध्ये? वास्तविक, हॉट कट नावाचे हे मेल सलून आपल्या एका खास सेवेसाठी ओळखले जाते. कारण येथे सुंदर तरुणी केशकर्तनाची सेवा देतात आणि तेही चक्क टॉपलेस होऊन.

याबाबत सलूनच्या मालक म्हणाल्या की, या सलूनमध्ये पूर्वी कुणीही येत नसल्यामुळे मी खूप त्रस्त होते. माझ्या डोक्यात तेव्हा कल्पना आली आणि ही आयडिया कामाची ठरली. यानंतर या सलूनमध्ये ग्राहकांची तोबा गर्दी व्हायला लागली. लोक कटिंग-दाढीसाठी महिनाभराच्या वेटिंगवर राहू लागले. हे अनोखे सलून आज पूर्ण जगभरात फेमस झाले आहे.