मध शुद्ध आहे किंवा नाही हे कसें ओळखावे?


मध हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे हे ज्ञान सर्वश्रुत आहे. पण मध शुद्ध आहे किंवा नाही हे प्रत्येकाला समजेलच असे नाही. आजकाल बाजारामध्ये मिळणाऱ्या अनेक पदार्थांमध्ये निरनिराळ्या प्रकारची भेसळ असते. ही भेसळ इतकी बेमालूम रित्या केली जाते की तो पदार्थ शुद्ध आहे किंवा नाही हे लवकर लक्षात येणे कठीण असते. मधही अश्याच पदार्थांपैकी एक आहे. त्यामुळे आपण वापरत असलेले मध शुद्ध आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी काही घरगुती उपाय करून पाहता येतील.

आपण खरेदी करून आणलेल्या मधाचे काही थेंब पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये टाकावेत. जर हे मधाचे थेंब ग्लासच्या तळाशी जाऊन बसले तर तर मध शुद्ध आहे असे समजावे. भेसळयुक्त मधाचे थेंब ग्लासच्या तळाशी न जाता पाण्यावरच तरंगतील. तसेच जर तुमच्याकडे आयोडीन उपलब्ध असेल, तर ह्याच्या मदतीने देखील मधाची शुद्धता पडताळून पाहता येईल. आपल्याकडे असलेल्या मधातील काही थेंब मध पाण्यामध्ये मिसळा. या मिश्रणामध्ये आयोडीनचे काही थेंब टाका. जर ह्या मिश्रणाचा रंग बदलून निळा झाला, तर मधामध्ये स्टार्चची भेसळ आहे हे ओळखावे.

मधाचे काही थेंब ब्लॉटिंग पेपर वर टाकावेत. मध शुद्ध असेल, तर हे थेंब जसेच्या तसे राहतील. जर ब्लॉटिंग पेपरमध्ये मधाचे थेंब शोषले गेले, तर हे मध भेसळयुक्त आहे असे समजावे. त्याचप्रमाणे एका काडीवर थोडासा कापूस गुंडाळावा. ही कापसाची काडी मधामध्ये बुडवावी आणि विस्तवावर धरावी. जर मध शुद्ध असेल, तर काडी त्वरित पेट घेईल. अश्या काही घरगुती उपायांच्या मदतीने मधाची शुद्धता पडताळून पाहता येईल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment