या मंदिरातील गरुड खांब कवेत घेतला तर होते इच्छापूर्ती


छत्तीसगड राज्यातील बस्तर या आदिवासी भागात असलेले ५२ शक्तीपीठातील एक दंतेश्वरी मंदिर अनोख्या कारणामुळेही प्रसिद्ध आहे. १४ व्या शतकात बांधल्या गेलेल्या या मंदिरात एक गरुड खांब आहे. असा समज आहे की जो भाविक या खांबाला पाठ लावून हात मागे करून हा खांब कवेत म्हणजे मिठीत घेऊ शकतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. हे मंदिर चालुक्य राजाचा काळात दक्षिण वस्तूशैलीत बांधले गेले आहे. असे म्हणतात कि येथे माता सतीचे दात पडले होते त्यामुळे त्याचे नाव दंतेश्वरी असे आहे.


येथील स्थानिक आदिवासीची ही आराध्य देवता आहेच पण काकतीय वंशाचा राजा अन्मदेव आणि बस्तर राजपरिवाराची ही कुलदेवता आहे. अशी कथा सांगितली जाते, अन्मदेव राजाने या देवीची उपासना केली तेव्हा ती त्याला प्रसन्न झाली आणि राजा जेथपर्यंत चालत जाईल तेथे देवी येईल आणि तेथपर्यंत राजाचे राज्य होईल. अर्थात राजाने मागे पाहायचे नाही अशी अट होती.

राजा चालू लागला आणि देवी त्याच्यामागोमाग निघाली. खूप मैल चालल्यावर नदी आली तेथे मात्र राजाला देवीच्या पैंजणाचा आवाज आला नाही म्हणून राजाने मागे वळून पहिले आणि देवी तेथेच थांबली. त्याजागी हे मंदिर बांधले गेले. मंदिरातील देवीची मूर्ती सहा भुजांची आणि काळ्या रंगाची आहे. देवीच्या सहा हातापैकी एकात शंख, खड्ग, त्रिशूल, घंटा, पद्म आणि सहाव्या हातात राक्षसाचे केस आहेत.

Leave a Comment