मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी २५० रु. भाडे


मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन साठी २५० रुपयापासून ते ३ हजार रु. असे तिकीट दर आकारले जाणार असल्याचे संबंधित अधिकारी सांगत आहेत. यावर्षी डिसेंबरपासून या रेल्वेचे काम सुरु होणार आहे. सध्याचा आकडेवारीनुसार भाडे किती आकारायचे याचा तपशील ठरविला जात आहे. २०२३ साली हे ट्रेन सुरु होणार आहे.

नॅशनल हायस्पीड रेल कार्पोरेशनचे अध्यक्ष अचल खरे म्हणाले कि सर्वसामान्य नागरिकांसाठी एकदम कमी भाडे आकारले जाणार आहे तर बिझिनेस क्लाससाठी जादा पैसे आकारले जाणार आहेत. विमान प्रवासाचा हिशेब केला तर विमानतळावर जाण्यासाठी लागणारा वेळ, बोर्डिंग पास, सुरक्षा तपासणी यांचा विचार करता हा प्रवास अधिक फायदेशीर होणार आहे.

महाराष्ट्र शासनाने जमीन अधिग्रहण अधिसूचना जारी केली असून या रेल्वे कामासाठी किमान ३० ते ४० हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.

Leave a Comment