जपानमध्ये का डिमांडमध्ये आहेत वॉटरप्रुफ फोन?


आता जगभरातच मोबाईल युजरचे प्रमाण वाढले आहे आणि दररोज नव्याने बाजारात दाखल होत असलेल्या स्मार्टफोनमुळे ग्राहकांना पसंतीसाठी खूप वाव आहे. मात्र जपान मध्ये गेल्या दशकापासूनच मोबाईल वॉटरप्रुफ असेल तर त्याला अधिक पसंती दिली जाते. हे प्रमाण इतके प्रचंड आहे कि ज्या मोबाईल उत्पादक कंपन्यांनी जागतिक मार्केटसाठी कधीच वॉटरप्रुफ फोन बनविले नाहीत त्या कोरियन एलजी ने जपानमध्ये मोड्युलर जी ५ फोन लाँच केलाच नव्हता कारण हे रीमुव्हेब्ल पार्टस सह सिल्ड उपकरण नव्हते.

जपानमध्ये वॉटरप्रुफ फोन अधिक वापरत असण्याचे कारण थोडे नवलाचे आहे. जपानमधील महिला वर्ग हे त्याचे कारण आहे. जपानी ललना पुरुषांच्या तुलनेत फोन जादा वापरतातच पण त्या फोनशी इतक्या जोडलेल्या असतात कि शॉवर घेतानाही त्यांना फोन हवा असतो. त्यामुळे त्या फोनच्या बॅटरी पेक्षा तो वॉटरप्रुफ असण्यास अधिक महत्व देतात.

पहिला वॉटरप्रुफ फिचरफोन २००५ साली आलेला कॅसीयो केनु ५०२ एस हा होता. नंतर मोटोरोलाने अँड्राईड दिफाय २०१० मध्ये आणला.२०१४ मध्ये सॅमसंग गॅलॅक्सिने एस ५ हा हायएंड फोन आणला. त्यांच्या नोट ७ वॉटरप्रुफ होता तसेच अॅपल चा आयफोन ७ वॉटरप्रुफ आहे. जपानी महिलांकडून असलेली प्रचंड मागणी फोन उत्पादक कंपन्या नजरेआड करू शकत नाहीत असेही सांगितले जाते.

Leave a Comment