आर्कुटचे भारताला पुन्हा हॅलो


आर्कुट डॉट कॉम या एके काळी भारतात अतिलोकप्रिय झालेल्या सोशल नेटवर्किंग साईटने भारताला पुन्हा आपलेसे केले असून हॅलो अॅपसह भारतात प्रवेश केला आहे. ऑर्कुटचे संस्थापक आर्कुट बुयुरखोकेन यांनी हे अॅप भारतात बुधवारी लाँच केले असून ते व त्यांची टीम भारतात मुंबई, दिल्ली, बंगलोर, चेन्नई, हैद्राबाद शहरांना भेटी देणार आहे. डेटा लिक प्रकरणात फेसबुक बदनाम झाल्याचा फायदा आर्कुटला होईल असा तर्क लढविला जात आहे.

एके काळी भारतात सोशल मिडिया म्हणजे आर्कुट असा समज होता. त्यवेळी भारतात आर्कुटचे ३० कोटी युजर होते. मात्र फेसबुकची लोकप्रियता जशी वाढली तशी आर्कुटची क्रेझ कमी झाली व अखेरी ही साईट बंद करावी लागली. आता हॅलो अॅप च्या माध्यमातून ते परत भारतात सक्रीय होत आहेत. सीईओ आर्कुट या विषयी बोलताना म्हणाले कि आभासी जगतात सकारात्मकता आणणे हा यामागे हेतू आहे. या अॅपचे वैशिष्ट असे कि युजर त्याच्या आवडीनुसार दुसऱ्या युजरला सर्च करू शकतील. हे अॅप आर्कुट प्रमाणेच यशस्वी होईल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. गुगल प्ले स्टोर मधून ते डाऊनलोड करून घेता येणार आहे. त्याचे आयएसओ व्हर्जन हि उपलब्ध आहे.

Leave a Comment