सॅमसंगचा ड्युअल रिअर कॅमेरा स्मार्टफोन लॉन्च


भारतीय बाजारपेठेत दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगने आपला नवा स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी जे ७ ड्यूओ लॉन्च केला असून या फोनची खासियत म्हणजे यात ड्युअल कॅमेरा सेटअप आणि अँड्रॉईड ओरियो देण्यात आले आहे. हा सॅमसंग कंपनीचा सर्वात स्वस्त ड्युअल कॅमेरा सेटअप असलेला स्मार्टफोन आहे.

रिअर ड्युअल कॅमेरा सेटअप या स्मार्टफोनमध्ये देण्यात आला असून त्यामध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आणि ५ मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सर्व कॅमेऱ्याला सेंसर्स f/1.9 अॅपेर्चर सपोर्ट करते. या फोनबाबत सॅमसंगने केलेल्या दाव्यानुसार, याचा उपयोग लो-लाईटमध्ये चांगली फोटोग्राफी करण्यासाठी करता येऊ शकतो.

५.५ इंचाचा एचडी सुपर AMOLED डिस्प्ले या फोनमध्ये देण्यात आला आहे. फोनमध्ये १.६GHz ऑक्टा-कोअर SoC सोबत ४ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. हा स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या सहाय्याने २५६ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकतो.

फोनमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने होम बटनवर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आले असून फेस अनलॉक फिचरही यामध्ये उपलब्ध आहे. स्मार्टफोनच्या पॉवर बॅकअपसाठी ३०००mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच फोनमध्ये एक नवे फिचर देण्यात आले असून अॅप पेयर बिल्ट-इन असे आहे. याचा वापर करुन दोन अॅपवर एकाच वेळेस काम करता येऊ शकते. सॅमसंगने लॉन्च केलेल्या गॅलेक्सी जे ७ ड्यूओ या फोनची किंमत १६९९० रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन ब्लॅक आणि गोल्ड या रंगांत उपलब्ध आहे.

Leave a Comment