रघुराम राजन यांची नोटाबंदीवर पुन्हा टीका


नवी दिल्ली – आपण सरकारला निश्चलनीकरण ही एक चांगली कल्पना नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते आणि प्रत्यक्षात कोणत्याही नियोजनाविनाच ८७.५ टक्के चलनी नोटा बाद ठरविणाऱ्या या प्रक्रियेची अंमलबजावणी केली गेल्यामुळे तो एक अविचारी निर्णय आणि निष्फळ उपक्रम ठरलयाची टीका रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम यांनी पुन्हा एकदा केली. त्याचबरोबर घिसाडघाईने वस्तू आणि सेवा कर प्रणालीची अंमलबजावणीही झाल्याचे त्यांनी सांगितले.

रिझव्‍‌र्ह बँकेशी सल्लामसलत न करताच सरकारने एकतर्फीच निश्चलनीकरणाचा निर्णय रेटला, असा राजन यांनी कोणताही दावा केंब्रिजस्थित प्रतिष्ठित हार्वर्ड केनेडी स्कूल येथे एका व्याख्यानात केला नाही. तसेच ८७.५ टक्के चलनी नोटा एका झटक्यात रद्दबातल ठरविणे हा अविचारच असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. त्याचवेळी आपण अद्याप वस्तू आणि सेवा कराबाबत आशा सोडलेली नसून, ही दुरुस्त न करता येणारी समस्या नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment