शाओमीचा मी ए २ येतोय २५ एप्रिलला


चीनी स्मार्टफोन कंपनीने २५ एप्रिलला एक इवेन्ट आयोजित केला असून यात मी ६ एक्स म्हणजेच मी ए २ हा स्मार्टफोन सादर केला जाईल असे संकेत दिले आहेत. कंपनीच्या अधिकृत विबो साईटवर याचा एक टीझर जारी केला गेला आहे. अर्थात यावर हँडसेटच्या नावाचा खुलासा केला गेला नसला तरी शाओमिच्या तीन स्मार्टफोन संबंधी माहिती दिली गेली आहे. त्यात मी ए २, मी ७ आणि ब्लॅक शार्क गेमिंग फोन चा उल्लेख आहे.

पैकी मी ७ याच तिमाहीत लाँच केला जाणार असल्याचे यापूर्वीचा जाहीर झाले आहे. मी ६ एक्स या फोनला काही दिवसापूर्वीच चीनच्या सर्टीफिकेट साईट टीनावर लिस्ट केले गेले आहे. हा फोन चीन मध्ये मी ६ एक्स नावाने तर भारतासह अन्य बाजारात मी ए २ नावाने आणला जाणार असल्याचे समजते.

लिक झालेल्या माहितीनुसार या फोनला अँड्राईड ओरिओ ८.१ ओएस, ५.९९ इंची फुल एचडी आयपीएस डिस्प्ले, ४ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेज, रीअरला २० व ८ एपीचे ड्युअल कॅमेरे, फ्रंटला २० एमपीचा कॅमेरा असेल असे समजते.

Leave a Comment