वाराणसीतील देवांच्या गुरुचे, बृहस्पतीचे मंदिर


देवांचे गुरु म्हणजे बृहस्पती. त्यांना देव मानले जात नाही त्यामुळे त्याची मंदिरेही देशात फारशी नाहीत. मात्र महादेवाचे निवासस्थान मानल्या गेलेल्या वाराणसीत बृहस्पतीचे एक प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिर असून त्यांना खुद्द महादेवानेच सर्व देवांच्या वरची जागा मंदिरासाठी दिल्याची कथा सांगितली जाते.

शिवाने जेव्हा वाराणसीमध्ये कायम राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा अन्य देवानीही त्याच्याजवळ येऊन राहण्याचा हट्ट धरला. त्यानुसार महादेवानी देवांना वास्तव्यासाठी जागा दिली. तेव्हाच त्यांनी देवांचे गुरु बृहस्पती यानाही वाराणसीत निवास करण्यासाठी खास उंचावरची जागा दिली. येथेच हे प्राचीन मंदिर बांधले गेले आहे. नऊ ग्रहांमाध्येही बृहस्पती म्हणजे गुरु श्रेष्ठ मनाला गेला आहे. त्यामुळेही त्याच्या मंदिराची जागा उंच ठिकाणी आहे. या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असते. दश्मेध घाट आणि विश्वेश्वर मंदिर मार्गावर हे मंदिर आहे.

Leave a Comment