आयपीएलविरोधी आंदोलनात पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा रजनीकांतकडून निषेध


चेन्नई – आयपीएलविरोधी आंदोलनात पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा सुपरस्टार रजनीकांत यांनी जोरदार निषेध केला आहे. रजनीकांत म्हणाले की, गणवेशातील पोलिसांवर झालेला हल्ला म्हणजे हिंसाचाराचे टोक असून हिंसाचाराची ही संस्कृती मुळासकट उखडून काढली नाही, तर ती देशासाठी मोठा धोका ठरेल.

रजनीकांत म्हणाले की, गणवेशातील पोलिसांवर ज्यांनी हात टाकण्याची हिंमत केली, आपल्याला त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी अधिक कठोर कायदे लागू करायला हवे. आपल्या तामिळ भाषेत रजनीकांत यांनी केलेल्या ट्विटसोबत पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा एक व्हिडिओ देखील जोडला आहे.

चिदंबरम क्रिकेट मैदानाबाहेर मंगळवारी सायंकाळी कावेरी मुद्द्यावर आयपीएलला विरोध करणाऱ्या आंदोलकांनी मोठा गोंधळ घातला. चेन्नईत आयपीएलचा सामना तामिळ चळवळीच्या समर्थकांनी कावेरी व्यवस्थापन मंडळाची स्थापना झाल्याशिवाय खेळवण्यास विरोध करत हिंसक आंदोलन केले. पोलिसांनी या प्रकरणी ७८० आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. यात ‘रजनी मक्कल मंद्रम’ या भविष्यात घोषणा होणाऱ्या राजकीय पक्षाच्या ५३ कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.

Web Title: The superstar took to Twitter to share a video of a protestor hitting a police personnel