इस्रोने केले नेव्हिगेशन सॅटेलाईटचे यशस्वी प्रक्षेपण


श्रीहरीकोटा – गुरुवारी सकाळी ०४.०४ मिनिटांनी आपल्या “इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटॅलाईट”चे (आयआरएनएसएस-१आय) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. पीएसएलव्ही-सी ४१ अग्नीबाणाच्या सहाय्याने हा उपग्रह आंध्र प्रदेशमधील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपित करण्यात आला.

आयआरएनएसएस-१ए ची जागा आयआरएनएसएस-१आय हा उपग्रह घेईल. इस्रोची बदली उपग्रह पाठवण्याची ही दुसरी वेळ असून ऑगस्ट २०१७ मध्ये यापूर्वी आयआरएनएसएस-१एचचे प्रक्षेपण अयशस्वी झाले होते. जलवाहतूक क्षेत्राला आयआरएनएसएस-१आयमुळे मदत होईल. यात समुद्री जलवाहतुकीबरोबरच मॅप आणि सैन्य क्षेत्रालाही मदत मिळेल. हा उपग्रह इस्रोच्या नाविक प्रणालीचाच एक भाग आहे.

Leave a Comment